बारामती (प्रतिनिधी)- बारामतीत नव्याने तिघेजण कोरोना संक्रमित असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. तर कन्हेरी येथील एका कोरून संक्रमीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दिनांक 21 रोजी घेतलेल्या एकूण 69 स्वॅब नमुन्यांपैकी 44 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि उर्वरित 25 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बारामती शहरातील कसबा येथील पस्तीस वर्षे वयाचा तरुण तसेच, शहरातील 85 वर्षाचा वृद्ध व गुरुकुल सोसायटी शिव नगर बारामती येथील 54 वर्षे वयाच्या पुरुषाचा समावेश आहे.