पुणे- घरातील केबल बंद असल्याची विचारणा केल्यास सूनेन थेट सासूचा गळा दाबून तीला संपवून टाकण्याची धमकी दिली. ही घटना उजव्या भुसारी कॉलनीतील आकाश अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी सूनेविरुध्द कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 59 वर्षीय सासूने फिर्याद दिली आहे. फिर्यादीने सूनेला घरातील केबल बंद असल्याने त्याबाबत केबलवाल्याकडे तक्रार केली का ? अशी विचारणा केली होती. याचा राग मनात धरुन सूनेने फिर्यादीला शिवीगाळ करुन घरात आदळ आपट केली.
यानंतर रागाच्या भरात फिर्यादीचा गळा धरुन तीला संपवून टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या डाव्या हाताचा चावाही घेतला. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक ढवाण करत आहेत.