पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित शहरातील सर्व महाविद्यालयांचे कर्मचारी, प्राध्यापक, सर्व विद्यार्थी यांनी रॅपिड ऍन्टीजेन टेस्टिंग करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी केले आहे.
करोना काळात मदतीसाठी पुढाकार घ्यावा व “रॅपिड ऍन्टीजेन टेस्टिंग’साठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी. जे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करतील त्यांना मानधन दिले जाईल, असे आश्वासन पुणे महापालिकेने दिले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांचा वैद्यकीय विमा व टेस्टिंग करताना स्वतःच्या सुरक्षेची घ्यावयाची काळजी याबाबत महापालिकेतर्फे व्यवस्था करण्यात येणार आहे.