पुणे : तडीपारीचा भंग करुन घरी रहात असलेल्या गुन्हेगारास खडकी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याच्यावर तडीपारीचा भंग केल्याचा गुन्हा खडकी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
खडकी पोलीस स्टेशन येथील अभिलेखावरील तडीपार आशिष संजय लोखंडे ( 23 रा स नं 26 बहिरट चाळ बोपोडी) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलीस हवालदार ठोकळ यांना गुप्त बातमीदारामार्फत आशिष लोखंडे हा त्याच्या राहते घरी आलेला आहे अशी बातमी मिळाली होती. लागलीच सदर ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रताप गिरी, पोलिस कर्मचारी ठोकळ, कदम, घुटे यांचे मदतीने सापळा रचून त्या पकडले . यानंतर खडकी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग ) सुनील फुलारी व पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलिस स्टेशन राजेंद्र सहाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) शफील पठाण यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.