पुणे – पुणेकरांना अक्षय्य तृतीयेला मुहूर्ताची सोने खरेदी करता यावी, यासाठी रांका ज्वेलर्सने सुवर्णयोजना जाहीर केलेली आहे. यामध्ये ग्राहक घरबसल्या रांका ज्वेलर्समध्ये शुद्ध सोने खरेदी करू शकतात, असे वस्तुपाल रांका यांनी सांगितले आहे.
घरबसल्या सोनं खरेदीसाठी ग्राहकांना फोनवरून शुद्ध सोन्याचे बुकिंग करता येईल. लॉकडाऊनंतर व्यवहार सुरू झाल्यावर ग्राहकांना त्यांचे सोने देण्यात येणार आहे. या सोन्याचा दरही “लॉक’ म्हणजे निश्चित केलेला आहे. आगामी काळात जरी सोन्याचे भाव वाढले, तरी ग्राहकांना बुकिंगच्या दराप्रमाणेच सोने मिळणार आहे. रांका ज्वेलर्सच्या नावीन्यपूर्ण दागिन्यांना ग्राहकांकडून नेहमीच मोठी मागणी असते.
हे लक्षात घेऊनच, शोरूम खुली झाल्यावर ग्राहक आपले शुद्ध सोने घेऊ शकतात किंवा त्याबदल्यात रांका ज्वेलर्सकडून सोन्याचे दागिनेही खरेदी करू शकतात.
रांका ज्वेलर्सचे वस्तुपाल रांका यांनी सांगितले की, “आम्ही या योजनेद्वारे ग्राहकांची सुरक्षितता आणि आपली परंपरा या दोन्हींमधील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही योजना रांका ज्वेलर्सच्या सर्व शोरूम्समध्ये सुरू असून या योजनेला पुणे व पिंपरी-चिंचवडमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.’