वॉशिंग्टन – अमेरिकेच्या एफडीए म्हणजेच फूड ऍन्ड ड्रग ऍडमिनीस्ट्रेशनने ट्रम्प प्रशासनाला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचे साईड इफेक्ट घातक असल्याचा रिपोर्ट आणि सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी भारताला धमकी देऊन मागवलेल्या या औषधांबद्दलच आता अमेरिकेत संभ्रम निर्माण झाला आहे.
करोना पेशंटला ट्रीटमेंट देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या औषधांच्या गोळ्या दिल्या जातात. पण त्याच्या साईड इफेक्टच्या साईड इफेक्टचा धोका त्या गोळ्यांच्या पाकिटांवरच नोंदवला आहे याकडेही एफडीएने लक्ष वेधले आहे. अगदी आणिबाणीच्या प्रसंगीच या गोळ्यांचा वापर करावा, काही विशिष्ट प्रसंगीच त्याचा वापर केला जावा असेही एफडीआयने सुचवले आहे.
कोविडच्या पेशंटवरही या गोळ्यांचा वापर करताना काळजी घ्यावी आणि जेव्हा क्लिनीकल उपचार शक्य नसतील किंवा अव्यवहार्य असतील तेव्हाच या गोळ्यांचा वापर करावा असेहीं एफडीएने सुचवले आहे.