पुणे – बडोदा बॅंकेच्या ग्राहकांना सध्या जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करता यावेत याकरिता त्यावरील शुल्क 3 महिने स्थगीत केले आहे. यामुळे ग्राहक बॅंकेत येण्याऐवजी डिजिटल व्यवहाराचा जास्तीत जास्त वापर करतील अशी आशा असल्याचे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
त्याचबरोबर बडोदा बॅंकेने “खुशियो का रिमोट कंट्रोल’ या योजनेअंतर्गत बरीच डिजिटल उत्पादने ग्राहकांना सादर केली आहेत. त्यामध्ये डेबिट कार्ड, बडोदा एम कनेक्ट प्लस, बडोदा कनेक्ट आणि बडोदा फास्ट टॅग या उत्पादनांचा समावेश आहे. यामुळे बडोदा बॅंकेच्या ग्राहकांना शाखेत येण्याऐवजी कुठूनही व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बॅंकेचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत.
ग्राहकांना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. सध्याच्या परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत व्यवहार कसे करावेत या संबंधात कर्मचारी आणि ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे बॅंकेने पत्रकात म्हटले आहे. तसेच, ग्राहकांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.