कनिकाबाबत डॉक्टर म्हणाले,…

मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. लंडनवरून परतली होती. मात्र आता तिला लखनऊमध्ये  आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. कनिका कपूरने कोरोनाची लागण झाल्याची गोष्टी लपवून ठेवली होती. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली तिची चौथी कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. त्यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत पुढची टेस्ट निगेटिव्ह यावी अशी अशा करते असं म्हटलं होतं.

त्यानंतर आता कनिका कपूर बाबत एक नवी माहिती समोर आली असून सध्या कनिकाची काय परिस्थिती आहे याची माहिती तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी स्वतः दिली आहे. कनिका कपूर सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्टग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कोरोना व्हायरसवर उपचार घेत आहे. या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आर. के. धीमान यांनी वृत्तमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कनिका गंभीर आजारी असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. तिची प्रकृती सध्या स्थीर असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. तसेच खाण्यापिण्याच्या वेळाही ती काटेकोरपणे पाळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.