कॉंग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष शिवसेनेकडे मागणी
मुंबई : शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईमध्ये यायच्या असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीविषयी संयज राऊत यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांनी केली आहे.
Indira ji was a true patriot who never compromised on India’s national security.
As former @INCMumbai President, I demand that @rautsanjay61 ji withdraws his ill-informed statement.
Political leaders must show restraint before distorting the legacies of deceased Prime Ministers
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) January 16, 2020
संजय राऊत यांच्या या वक्तव्यासंदर्भात कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी कधीच तडजोड केली नाही. मुंबई कॉंग्रेसचा माजी अध्यक्ष या नात्याने मी संजय राऊत यांच्याकडे चुकीची माहिती देणारे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतो असे मिलिंद देवरा यांनी सांगितले आहे. तसेच, राजकीय नेत्यांनी दिवंगत पंतप्रधानांविषयी बोलण्यापूर्वी संयम ठेवला पाहिजे असं देखील देवरा यांनी सांगितले आहे.
तर, कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखील ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांना शेरोशायरीच करण्याचा सल्ला दिला आहे. संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, शिवसेनेच्या मिस्टर शायरांनी इतरांच्या हलक्या-फुलक्या शायरी ऐकवत महाराष्ट्राचे मनोरंजन करणेच चांगले राहील, असा टोमला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी अपप्रचार केलात, तर पश्चातापाची वेळ येईल. काल संजय राऊतांनी इंदिरा गांधींविषयी जे वक्तव्य केले, ते मागे घ्यावे अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.