पिंपरी : पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष निवडीबाबत पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी येथे बैठक पार पडली.
यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, खासदार अमर साबळे, मावळते अध्यक्ष लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडगिरी व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये भाजप शहराध्यक्षपदासाठी भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आमदार लांडगे हे भोसरी मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. 2019 च्या निवडणुकीत ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढले. त्यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली आहेत.