पेठ परिसरातील कांदा पिकावर रोगाचा प्रादूर्भाव
रोगांपासून बचाव करण्यात शेतकरी मग्न
कांद्याला मिळालेला उच्चांकी बाजारभाव पाहता यंदा रब्बी हंगामात कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. कांदा पिकांवर पडत असलेल्या रोगांपासून बचाव करण्यासाठी खते, औषधे फवारणी करुन शेतकरी कांदा पिकांची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. वेळोवेळी औषधांची फवारणी करण्यात मग्न असलेले शेतकरी दिसून येत आहेत.
पेठ – सध्या कांद्याच्या दराने या वर्षातील उच्चांकी पातळी गाठली होती. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा होता त्यांना याचा नक्कीच फायदा झाला आहे, मात्र दुसरीकडे सध्या लावलेल्या कांदा पिकावर ढगाळ हवामानामुळे रोग पडू लागला आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
राज्यातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याला सरासरी 150 रूपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला आहे. जिल्ह्यातील राजगुरूनगर, मोशी, मंचर बाजारसमित्यांमध्ये कांद्याला उच्चांकी भाव मिळाला आहे. दोन नंबरच्या गावरान कांद्याला आणि एक नंबरच्या नव्या कांद्याला देखील अपेक्षेपेक्षा जादा बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
कांदा पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी भल्या पहाटे शेतात जाऊन आटोकाट प्रयत्न करत आहे. कांद्याला मिळालेला उच्चांकी बाजारभाव पाहता यंदा रब्बी हंगामात कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. कांदा पिकांवर पडत असलेल्या रोगांपासून बचाव करण्यासाठी खते, औषधे फवारणी करुन शेतकरी कांदा पिकावर विविध प्रकारच्या फवारण्या करत आहेत