अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास खडकीतून अटक

मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथे परजिल्ह्यातून कामासाठी आलेल्या शेतमजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन मंचर पोलिसांनी नितिन पोपट भोर (वय 30, रा.खडकी, ता.आंबेगाव याला अटक केली आहे.

यासंदर्भात पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.22) नोव्हेंबर रोजी कळंब येथील गावातील औषध दुकानातून औषध आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती अद्याप परत घरी आलीच नाही. या परिसरातस तीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू ती या भागात कोठेही मिळुन आली नाही.

दरम्यान, आरोपीने तिच्यावर पारनेर तालुक्‍यातील एका गावात, सावरगाव (ता.जुन्नर) येथे झोपडीत आणि खडकी (ता. आंबेगाव) येथे ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक व ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी (दि. 11) खडकी येथील वस्तीवरुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे याघटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.