जुन्नर – जुन्या भांडणाची तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून दोन युवकांनी शिवली (ता. जुन्नर) येथील एका वृद्ध महिलेला शिवीगाळ व मारहाण करीत संपूर्ण घरच उद्ध्वस्त केल्याची घटना घडली. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर एकास अटक करून त्यास येरवडा येथे पाठवले आहे. तर दुसऱ्या आरोपीला अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
किरण मारुती आढारी व गणपत विठ्ठल आढारी (दोघेही रा.शिवली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर भामाबाई भिका कोकणे (वय 70, रा. शिवली, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. कोकणे यांचा मुलगा शिवाजी हा नोकरीनिमित्त बाहेरगावी असून हल्ल्याप्रसंगी अटकाव करणाऱ्या ग्रामस्थांवर या जोडगोळीने विटा, दगड फेकून दहशत निर्माण केली. हवालदार संदीप लोहकरे व राजेंद्र बुरुड पुढील तपास करीत आहेत.