भाजप आमदारांचे ‘मंत्री’ होण्याचे स्वप्न भंगणार?

आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगेंमध्ये होती स्पर्धा

पिंपरी – राज्य शासनामध्ये पिंपरी-चिंचवड शहराला आमदार लक्ष्मण जगताप किंवा महेश लांडगे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपाने सत्तास्थापनेतून माघार घेतल्यामुळे तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने या दोघांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. जोरदार फिल्डींग लावलेल्या दोन्ही आमदारांचाही आता राज्यात भाजपाचे सरकार येणार नसल्याची चिन्हे दिसत असल्यामुळे हिरमोड झाला आहे.

रामकृष्ण मोरे यांच्यानंतर शहरातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अजित पवार हेच शहराचा कारभार पाहात असल्यामुळे इतरांना संधी देण्यात आली नव्हती.

राष्ट्रवादीतील नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या
सत्तास्थापनेमध्ये राष्ट्रपती राजवटीनंतरही राष्ट्रवादीचे महत्त्व कायम आहे. शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येण्याची शक्‍यता असल्यामुळे मावळामधून विजय मिळविणारे सुनील शेळके यांना संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तर शहरातील निष्ठावंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना महामंडळाची ओढ लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून हद्दपारीच्या उंबरठ्यावर असलेल्या राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना विविध पदांच्या माध्यमातून ताकद दिली जाण्याची शक्‍यता आहे.

आमदारांचे “मंत्री’ होण्याचे स्वप्न भंगणार?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे त्यांचेच सरकार येईल, अशी खात्री निर्माण झाल्यामुळे भोसरी आणि चिंचवडमध्ये दणदणीत विजय मिळविणाऱ्या महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. विजयानंतर दोघांच्या समर्थकांनी “मंत्रीसाहेब’ अशी बॅनरबाजीही केली होती. पुणे जिल्ह्यातील मंत्रीवाटपामध्ये पिंपरी-चिंचवडला संधी मिळेल, अशी परिस्थितीही यावेळी निर्माण झाली होती. गतवेळच्या सरकारमधील दोन मंत्री पराभूत झाल्यामुळे शहरातील दोनपैकी एका आमदाराला नक्कीच संधी मिळण्याची शक्‍यता होती. मात्र भाजपाचे सरकार स्थापन होणार नसल्यामुळे दोन्ही आमदारांसह समर्थकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here