मुंबई: राज्याचे नवोदित खेळाडुू भक्ती खामकर आणि हर्षवर्धन यादव यांचा भीष्मराज बाम स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत यंदा रायफल नेमबाजीमध्ये सर्वाधिक प्रतिभावान खेळाडू म्हणून तिसऱ्या भीष्मराज बाम स्मृती पुरस्कारासाठी मुंबई शहरच्या भक्ती खामकरची निवड झाली. तिला 25 हजारांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 50 मीटर रायफल प्रकारात तिने जबरदस्त कामगिरी करून दाखविली.
पिस्तूल नेमबाजीत हाच पुरस्कार पुण्याच्या हर्षवर्धन यादवला मिळाला. त्याने 25 मीटर पिस्तूल प्रकारात वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत या दोन खेळाडूंच्या बरोबरीने 50 मीटर पिस्तूल प्रकारात नाशिकच्या सागर विधातेने 540 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. ज्युनियर गटात कोल्हापूरच्या यश साळोखेने 519 गुणांसह सुवर्णविजेती कामगिरी केली.
निकाल-
50 मीटर पिस्तूल (पुरुष)
1) सागर विधाते (नाशिक; 540), 2) सलमान खान पटेल (कोल्हापूर; 537), 3) राजेंद्र बागुल (पुणे; 537)
50 मीटर पिस्तूल (ज्युनियर)
1) यश साळोखे (कोल्हापूर; 519), 2) सुयश पाटील (कोल्हापूर; 516), 3) प्रदीप निघोते (पुणे; 515).