“लाल कप्तान’मध्ये सैफबरोबर आणखी 3 स्टार

“लाल कप्तान’ हा असा सिनेमा आहे की त्यात वेगवेगळ्या कथानकामध्ये वेगवेगळे कलाकार सहभागी होत आहेत. यामध्ये सैफ अली खान आतापर्यंतच्या सर्वात हटके लुकमध्ये बघायला मिळणार आहे. सैफने हा अगही अवघड रोल मुद्दामच निवडला आहे. या सिनेमात तो नागा साधूच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्याच्या शिवाय आणखी तीन महत्वाचे स्टार यामध्ये दिसणार आहेत.

दीपक डोबरियाल हा एका ट्रेकरच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्याला सिनेमात अतिशय तीव्र घ्राणेंद्रिय असलेल्या व्यक्‍तीचा रोल करायचा आहे. याशिवाय मानव विज हा देखील एकदम हटके रोलमध्ये असणार आहे. त्याच्या रोलबाबत थोडी उत्सुकता कायम आहे.

याशिवाय “मुक्केबाज’मध्ये आपल्या ऍक्‍टिंगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी जोया हुसैन “लाल कप्तान’मध्ये सैफ अली खानच्या हिरोईनच्या रोलमध्ये दिसणार आहे. एकाच वेळी ऍक्‍शन- ड्रामा आणि थोडा सस्पेन्स असलेल्या “लाल कप्तान’ची मुख्य कथा सूड आणि छळ-कपटाच्या आजूबाजूस फिरणारी आहे. त्यामध्ये हे अन्य स्टार काय काय भर घालत आहेत ते समजेलच लवकरच.

Leave A Reply

Your email address will not be published.