ओतूर (प्रतिनिधी) – सोमवारी (दि.५) सकाळी ७च्या सुमारास ओतूर (ता.जुन्नर) मधील एका जुन्या घराची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या भिंती त्याखाली एक महिला मयत झाली तर, तीन लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत नज्जो सलिम शेख (वय-३८) ही महीला मयत झाली असून हिना अस्लम शेख (वय-२०), आयन अस्लम शेख (वय-०४) व शोयब अस्लम शेख (वय-दिड वर्ष) ही तीन मुले जख्मी झाली आहेत.
दरम्यान, जखमी मुलांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहीती ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश खुणे यांनी दिली. घटनास्थळी जुन्नरचे तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी देखील भेट दिली आहे.