पुणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सिंहगड रस्ता येथील एकता नगरी या पुरग्रस्त भागाची पाहणी केली. या भागातील दहाहुन अधिक सोसायट्याना पुराचा फटका बसला असून 100 हुन अधिक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त राव यांच्यासह आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका मंजुषा नागपुरे, नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्यासह दीपक नागपुरे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी नगरसेवकाकडून तातडीनं भविषयतील पूर स्थिती रोखण्यासाठी कायम स्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी केली.
दरम्यान, त्या पुर्वी महापालिकेचे विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे यांनीही या भागाची पाहणी केली असून महापालिकेने तातडीनं पूरग्रस्तांना सुविधा देण्याची मागणी केली आहे.