10 ऑगस्टला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा होणार भाजप प्रवेश
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्यादेखील वाढतच जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपा पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मधील दिग्गज नेते भाजपमध्ये आले. या मेगाभरतीनंतर पुन्हा 10 ऑगस्टला भाजपामध्ये विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजपासून महाजनादेश यात्रा सुरु होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात पहिल्या टप्प्यात ही यात्रा जाणार आहे. त्यामुळे मराठवाडा-विदर्भातील अनेक नेते भाजपात प्रवेश करणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक आमदार भाजपात प्रवेश करतील. पहिल्या टप्प्यात भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. त्यात मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक ,कालिदास कोळंबकर शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षप्रवेश केला. आता त्यातच 10 ऑगस्टला आणखी कोणते बडे नेते भाजपात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.