MLA Sunil Shelke । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक बडे नेते पक्ष बदल करताना दिसत आहेत. त्यात काल अजित पवार गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच मुद्द्यावर निलेश लंकेचे जवळचे मित्र आमदार सुनील शेळके यांनी मोठा आरोप केलाय. निलेश लंकेंचा महाविकास आघाडी बळी घेतेय, असा आरोप शेळके यांनी केला आहे.
रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्यामुळे निलेश लंकेंचा बळी MLA Sunil Shelke ।
“महायुतीची दक्षिण नगरची जागा सध्या भाजपच्या ताब्यात असल्यामुळे ती जागा त्यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे. जर ती जागा भाजपकडेच जाणार असेल आणि तिथे महाविकास आघाडीसाठी पर्याय शिल्लक नव्हता. ज्यांना पर्याय म्हणून उभं केलेलं त्या रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळेच निलेश लकेंना गळ घालून तिथून लोकसभा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाग पाडलं जातय. पण मला विश्वास आहे, निलेश लंके कुठेच जाणार नाहीत, ते दादांसोबतच राहतील.”, असं सुनील शेळके म्हणाले.
मार्गदर्शनासाठी मी शरद पवारांची भेट घेणार MLA Sunil Shelke ।
दरम्यान, काही दिवसापूर्वी शरद पवारांनी सुनील शेळकेंना काही दिवसांपूर्वी तंबी दिल्याचे समोर आले होते. याबाबत बोलताना सुनील शेळके म्हणाले की, “शरद पवार आमचे श्रद्धास्थान आहेत. इथल्या स्थानिक मंडळींनी त्यांना काहीतरी चुकीची माहिती दिली. त्यातून त्यांच्या मनात वेगळे गैरसमज पसरवण्याचं काम केलं. पण मी सांगितलं की, त्याच्याविषयी आजही आमच्या मनात तेवढाच आदर आहे. शेवटी राजकारण आहे. राजकारणात सगळं काही आलबेल असतं असं नाही. मी शरद पवारांची लवकरच भेट घेणार आहे. त्यांनी वडिलकीच्या नात्यानं नेहमीच मला समजावलं आहे. पण मार्गदर्शनासाठी मी नक्कीच भेट घेईल.” असे म्हटले.
मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल
मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी मी गेल्या चार महिन्यांपासून आग्रही आहे. त्यासाठी मी सर्व वरिष्ठांना लोकसभा मतदारसंघातील समीकरणंही समजावून सांगितली आहेत. त्यामुळे येत्या काळात मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल, असा विश्वास मला आहे, असं सुनील शेळके म्हणाले.