Sujat Ambedkar। लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. लोकभा निडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाची फायनल यादी तयार झाल्याची चर्चा आहे तर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचाही समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांनावर जागावाटपावरून आरोप केले आहे.
अशात आता प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर लोकसभा निडवणुक लढवणार असल्याची चर्चा आहे. ते अमरावती मतदार संघातून लढणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चांवर आता वृत्तमाध्यमांशी बोलतांना सुजात आंबेडकर प्रतिक्रिया दिली आहे.
Sujat Ambedkar। नेमकं काय म्हणाले सुजात आंबेडकर
‘मी निवडणूक लढणार कि नाही हे पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचा निर्णय आहे. माझ्या उमेदवारीचा निर्णय सर्वस्वी पक्ष श्रेष्ठी घेतली.माझ्या उमेदवारीबाबत अमरावतीच्या कार्यकारिणीकडून प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. मी अमरावतीच्या कार्यकारिणीला धन्यवाद देतो.’
तो पुढे म्हणाला,’माझ्यासारख्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव येणं हे पाठीवर थाप मारण्यासारखेच आहे. माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण माझ्या उमेदवाराची निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल,” असे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.