Ajit Pawar । नुकताच अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाकडून निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये उत्साह दिसून येतोय. त्यानंतर आता या सत्ताधारी गटाने शरद पवारांना आणखी एक धक्का देण्यासाठी पक्षाचे मुख्यालय ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार गटातील वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
अशात हा संघर्ष सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना थेट सरड्याशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर हँडलवर अजित पवार यांचा व्हिडिओ शेअर करून ही तुलना करण्यात आली आहे.
आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत ह्याचं भान मात्र त्याला राहत नाही. अजित पवारांच्या तोंडी महविकास आघाडीचं नाव येणं हा त्यातलाच प्रकार आहे. उपमुख्यमंत्री जरा सांभाळून, घार घिरट्या… pic.twitter.com/m0KUgLmQdJ
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 10, 2024
काय आहे फेसबुक पोस्ट
आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत ह्याचं भान मात्र त्याला राहत नाही. अजित पवारांच्या तोंडी महविकास आघाडीचं नाव येणं हा त्यातलाच प्रकार आहे. उपमुख्यमंत्री जरा सांभाळून, घार घिरट्या घालतेच आहे!! अस म्हणत खोचक टीका केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काही जिल्ह्यांतील पक्ष कार्यालये अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत. तर काही जिल्ह्यांत ते शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ हे मुंबईत आहे.
हेही वाचा