किवळे, (वार्ताहर) – पुणे-मुंबई एक्स्प्रेस रस्त्यावर पुणे शहराकडे येत असताना ट्रकची समोरील ट्रकला जोरदार धडक बसून अपघात झाला. यामध्ये समोरील ट्रकचालकाच्या सोबत असलेल्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ८) पुणे-मुंबई रस्त्यावर शिरगाव येथे घडली.
रोशनलाल नारायण मीना (वय ३०, राजस्थान), असे मृताचे नाव आहे. ट्रकचालक सावरलाल ईश्वरलाल नायक (वय ३२, रा. समेलिया, राजस्थान) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकचालक अजय रमेश मीना (२०, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी त्यांच्याकडील ट्रक घेऊन द्रुतगती मागनि पुण्याकडे येत होते. आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रकची