मुंबई – मुंबईतील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले बाबा सिद्दीकी यांनी अखेर आज आपल्या हाती घड्याळ बांधले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत त्यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला.
त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्तेही आज अजित पवार गटात सहभागी झाले. या कार्यक्रमात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.
बाबा सिद्दीकी म्हणाले, गेल्या ४८ वर्षांनंतर मी आज पहिल्यांदा काँग्रेससाठी भाषण करत नाही. तसेच पक्षप्रवेशाबाबत प्रफुल्ल पटेल यांच्या घरी न्याहारी करताना चर्चा झाली, त्याच दिवशी १० तारखेला मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे ठरले.
मी त्याच दिवशी काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि ४८ वर्षांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.