Indian Navy : भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. भारतीय नौदलाने सांगितले की, क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आणि डागलेल्या क्षेपणास्त्राने सर्व लक्ष्य गाठले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नौदलाकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही काल घेण्यात आली. नौदलाची अग्रगण्य स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारी विनाशक युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.
An #IndianNavy destroyer of @IN_EasternFleet carried out successful firing of #BrahMos missile in the #BayofBengal.
The missile achieved all mission objectives.@DefenceMinIndia @SpokespersonMoD @IndiannavyMedia pic.twitter.com/MUzNdvuft1— SpokespersonNavy (@indiannavy) November 1, 2023
याविषयीची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली असली तरी या चाचणीचे ठिकाण कळू शकले नाही. दरम्यान, भारतीय नौदलाच्या या यशस्वी चाचणीने भारतीय सैन्याची ताकद वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.