पुणे – आज सकाळी दहाच्या सुमारास काञज-कोंढवा रस्ता, केदारेश्वर नगर, पाण्याच्या टाकीजवळ घरामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून ४ अग्निशमन वाहने व ३ वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी झोपड्यांच्या चार ही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व आग इतरञ पसरु नये याची खबरदारी घेतली. सुमारे तीस मिनिटानंतर आग आटोक्यात आली
मिळलेल्या माहितीनुसार, या आगीमधे एक गॅस सिलेंडर फुटले आणि इतर सहा सिलेंडर जवानांनी तातडीने बाहेर काढले. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सदर ठिकाणी एकुण सहा झोपड्या आगीमध्ये पुर्ण जळाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे राहत असलेल्या नागरिकांचे घरामध्ये असलेले सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, गंगाधाम, काञज अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहने व मुख्यालयातून वॉटर टँकर तसेच अग्निशमन अधिकारी समीर शेख, सचिन मांडवकर, सुनिल नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २० ते २५ जवानांनी सहभाग घेतला.