हडपसर : मराठा आरक्षणसंबंधी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एकमताने निर्णय घ्यावा, अशी मागणी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आमदार चेतन तुपे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘दीर्घकालीन मागणीच्या पूर्ततेबाबत राज्यभरातील मराठा समाज अत्यंत आग्रही आहे.त्यामुळे या विषयावर विधिमंडळात ठराव करून मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आपला पूर्ण पाठिंबा आहे.सर्व आमदारांनी एकत्र येऊन यावर साधक-बाधक अशी चर्चा होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यानी किमान दोन दिवसांचे विधानसभेचे विशेष अधिवेश बोलवावे. म्हणजे जेणेकरून सर्वच लोकप्रतिनिधींना आपली भूमिका व म्हणणे मांडता येईल. येथूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा मार्ग निघेल. अशी आशा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे या मागणीचे पत्र मंगळवारी ( दि.३१ ) मेलद्वारे पाठवले असून आज त्यांचे प्रतिनिधी अनिल पाटील यांना प्रत्यक्षात देण्यात आले आहे. आपण दिलेल्या या पत्रावर इतर आमदारांनी ही स्वाक्षरी केल्या आहेत.विशेष अधिवेशनात नक्कीच तोडगा निघेल त्यामुळे तसे प्रयत्न करायला हवेत.
चेतन तुपे पाटील आमदार, हडपसर विधानसभा.