मुंबई -अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडली आहे. काल रविवारी शिंदे – फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या संपूर्ण घटनेनंतर आज गुरुपौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केले आहे. मात्र यात शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले की, “भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच. आदरणीय साहेबांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.”
भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे.
मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच.… pic.twitter.com/CXvqqC1qwx
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 3, 2023
तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरुपौर्णमेनिमित्त अजित पवार यांनीही ट्विट केलं आहे. आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणाऱ्या, स्वप्नांच्या पंखांना बळ देणाऱ्या आणि एक आदर्श नागरिक आपण बनावं म्हणून आपल्यामध्ये सदाचारी विचारांची रुजवण करणाऱ्या तमाम गुरुजनांना ‘गुरुपौर्णिमा’निमित्त कोटी-कोटी प्रणाम! ‘गुरुपौर्णिमा’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर जयंत पाटील यांनी मी शरद पवारांसोबतच असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.