Pune Porsche Accident । कल्याणीनगर येथे आयटी अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणातील अल्पयवीन कारचालक मुलाला बालन्याय मंडळाने सुनावलेला आदेशामुळे संपूर्ण स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या अपघात बळी गेलेल्या आयटी अभियंता तरुण अनिस अवधियाच्या आईने मेरा बच्चा अच्छा था… असं म्हणत हंबरडा फोडला आहे.
माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’ ‘माझा मुलगा मला परत द्या… माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती… त्याची काहीच चूक नव्हती तरी माझ्या मुलाची काय चूक होती की त्याला एवढ्या अमानुषपणे का मारले? मेरा बच्चा अच्छा था… असं म्हणत आईने संताप व्यक्त केला आहे.
अनिस अवधियाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही कुटूंबाने प्रश्न उपस्थित केले आहे. वृत्तमाध्यमांशी बोलतांना अनिस अवधियाच्या आई म्हणाली,’माझा मुलगा तीन वर्षापासून पुण्यात होता. तो अतिशय गुणी होता. आमच्यापासून दूर असला तरी आमची काळजी घ्यायचा. रविवारी रात्री 3 वाजता मला त्याच्या मित्रांचा फोन आला. त्याचे मित्र म्हणाला, ‘काकू अनिसच्या बाबांना फोन द्या आम्हाला त्यांच्यशी बोलायचे आहे. अनिसचा अपघात झाला तो सिरिअस आहे. लवकर या… आम्ही इतक्या दूर होतो कसं जाणार … त्यानंतर काही वेळातच त्या मृत्युची खबर आली. तो माझी, त्याच्या लहान भावाची तसेच पूर्ण कुटुंबियांचा आधार होता. मला माझा मुलगा परत द्या… ” अस म्हणत अनिसच्या आईने आक्रोश व्यक्त केला आहे.
हे वाचाल का साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य बनला पोर्श कारचा मालक, किंमत आहे 3.50 कोटी रुपये