Sharad Pawar On Narendra Modi – लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रात पाचवा आणि अखेरचा टप्पा सोमवारी पार पडला. अनेक ठिकाणहून मतदानासंदर्भात तक्रारीही समोर आल्या. त्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.
परंतु आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. एका युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी स्वत: चं पंतप्रधान पदावरुन माघार घेतील, असे विधान केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रणोय रॉय यांनी आपल्या डीकोडर या युट्यूब चॅनलवरील काऊंटडाऊन महाराष्ट्र 2024 या कार्यक्रमासाठी शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्राबाबत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तसंच, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदींना मी जेवढं ओळखतो, त्यानुसार ते जे काही दावे करत आहेत, त्या दाव्यांवर जर त्यांना खरंच विश्वास असेल आणि ते म्हणत आहेत त्याप्रमाणे यश तसं बहुमत त्यांना मिळाले नाही. तसेच सत्तास्थापनेसाठी त्यांना दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहावे लागले तर मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या दाव्यावरुन स्वत:चं बाजूला होतील, असे मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र नेहमीच प्रगती करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक राहिला आहे. जर पुन्हा महाराष्ट्राला तिथे न्यायचं असेल, तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. तर कोणाला भारतात गुंतवणूक करायची असेल, तर पूर्वी त्यांची पहिली पंसती महाराष्ट्र असायची.
पण आता ते घडताना दिसत नाही. हे राज्यातल्या नेतृत्वामुळे घडत आहे. सरकार नियंत्रित करणाऱ्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.