नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी आता कसे दिसत आहेत यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी काल एक टिप्पणी केली होती. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, अशा गोष्टी ऐकल्यावर लोक थोडेसे हसतात आणि विसरून जातात. त्याला फार महत्व देण्याची आवश्यकता नाही.
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. तो रोज काही किमी अंतर पायी चालत असून त्यांची दाढीही बऱ्यापैकी वाढली आहे. त्यावर सरमा यांनी टिप्पणी केली होती. राहुल गांधी सद्दाम हुसेन यांच्यासारखे दिसत असल्याचे सरमा म्हणाले होते. त्याबाबत शहा यांनी ही प्रतिक्रिया दिली. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे.
लोक अशा विधानांचा आनंद थोडा वेळ घेतात आणि नंतर विसरूनही जातात असे ते म्हणाले. दरम्यान, कालच कॉंग्रेसने या विधानावरून सरमा यांच्यावर टीका केली होती. सरमा पूर्वी कॉंग्रेस नेत्यांचे पाय धरत असत असे पक्षाचे नेते दिग्विजय सिंह म्हणाले होते.