पाच वर्षांत परिवहन कार्यालयाकडून तब्बल पावणेबारा कोटींचा दंड वसूल
दिगंबर पडकर
जळोची – बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाने दमदार कामगिरी करत वाहन मालक-चालक यांच्यावर मोटर वाहन कायद्यांतर्गतअंतर्गत कारवाई करत मागील पाच वर्षांत तब्बल 11 कोटी 74 लाख 52 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड या तीनही तालुक्यात वायुवेग पथकामार्फत रस्त्यावर वाहनांची तपासणी व रस्ता सुरक्षा विषयक बाबी तपासल्या जातात.
ायुवेग पथकाने हा महसूल वाहनांचा फिटनेस, परवाना इन्शुरन्स, ओव्हरलोड वाहतूक, अवैध प्रवासी, हेल्मेट, रिफ्लेक्टर आदी बाबीतून गोळा केला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड हे तीन तालुके राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे तालुके आहेत. या तीन तालुक्यातील वाहनधारकांच्या सोयीसाठी बारामती येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत विविध वाहना संदर्भातील वाहन परवाना, योग्यता प्रमाणपत्र, आदी कामे ज्या तत्परतेने केली जातात. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत वाहन मालकांकडून दंड आकारला जातो.
आज बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर हे स्वतः रस्त्यावर थांबून कारवाई करीत आहेत. त्यांनी दिनांक 31 मार्च 2014 पासून वाहनाचा कर 3 लाख 27 हजार 576 रुपये भरलेला नसताना सुद्धा व वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी न करता (फिटनेस सर्टिफिकेट नसणारे) 15 वर्षे 4 महिने झालेले टिप्पर हे वाहन पकडून शासनाचा महसूल वसूल करण्याकरिता वाहन ताब्यात
घेतले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जी दंडात्मक कारवाई केली जाते. त्या दंडाची रक्कम वाढविण्यात आले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हाती अठरा वर्षे पूर्ण झाल्यावरच वाहन पाल्याच्या हातात द्यावे. वाहतुकी संदर्भात जनजागृती होणेही गरजेचे आहे. त्याकरिता आम्ही शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करणार आहोत.
-राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती
बारामती आरटीओला आयएसओ
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास अत्याधुनिक इमारत आहे. त्याचबरोबर नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व नागरी सेवा गुणवत्तापूर्वक, पारदर्शक व वेळेत देण्यात येतात. या मुख्य तीन निकषांच्या आधारावर बारामती आरटीओला 2022 वर्षामध्ये आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.