पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. मेणच काय तर माणूसही वितळेल असं भयानक ऊन सध्या पडत आहे. आपण माणसे उन्हापासून वाचण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करू शकतो, परंतु मुक्या जनावरांचे मात्र अशावेळी हाल होताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची देखील काळजी घेणं आवश्यक आहे.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे, जो पाहून तुम्हाला संबंधित व्यक्तींचे कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही. व्हायरल झालेला हा व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातील आहे. महार्गावर तैनात असलेले वाहतूक पोलीस जवळपासच्या जंगलातून रस्त्यावर येणाऱ्या प्राण्यांना देण्यासाठी पाण्याच्या अनेक बाटल्या घेऊन जातात.
View this post on Instagram
या व्हिडिओत ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी संजय घुडे एका तहानलेल्या माकडाला बाटलीतून पाणी पाजताना दिसतात. माकडही आपल्या हाताने बाटली पकडून पाणी पित आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील या पोलीस कर्मचाऱ्याला सलाम कराल.
View this post on Instagram
दरम्यान, हा ऋषिकेश आढाव rushikeshadhav2 या मुलाने शूट केला असून, StreetDogsofBombay नावाच्या इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, काही बॉलिवूड कलाकारांनी देखील हा व्हिडिओ लाईक केला आहे.