वुहान : मागील दोन वर्षापासुन जगाला पूर्णपणे बंदिस्त करणाऱ्या करोनाचा सध्या भारतात प्रसाराचा वेग कमी झाला आहे. मात्र ज्या देशातून या विषाणूची उत्पत्ती झाली त्या चीनने आता पुन्हा एकदा जगाला टेन्शन दिले आहे. कारण चीनमध्ये करोनामुळे पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ ओढावली आहे.
जगात अनेक देशात लसीकरणामुळे करोनाच्या विळख्यातून बाहेर पडत आहेत तर दुसरीकडे चीनने जगाला पुन्हा धडकी भरली आहे. चीनमध्ये करोनाचा नवा उपप्रकार आढळला असून हा उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हेरियंटमुळे चीनमध्ये एका दिवसात १३ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने चीनसमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, शांघाईपासून ७० किमीपेक्षा कमी अंतरावर असलेल्या शहरातील सौम्य लक्षणं असणाऱ्या एका करोना रुग्णापासून हा नवा उपपक्रार विकसित झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिक्वेंसिंग डेटा आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सांगण्यात आले आहे.
दरम्यान अहवालात म्हटले आहे की, उपप्रकार चीनमधील करोना किंवा GISAI, जिथे जगभरातील शास्त्रज्ञ उत्परिवर्तनांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी सिक्वेसन्स केलेला करोना व्हायरस शेअर करतात त्यांच्याकडे सादर केलेल्या इतर करोनाशी जुळत नाही.
उत्तर चीनमधील डालियान शहरात शुक्रवारी नोंदवण्यात आलेल एक एक प्रकरणदेखील देशांतर्गत आढळलेल्या कोणत्याही करोना व्हायरसशी जुळत नाही, अशी माहिती पालिकेने WeChat वर दिली आहे. शनिवारी देशभरात नोंदवलेल्या आलेली जवळपास १२ हजार प्रकरणं कोणतीही लक्षणं नसणारी असल्याचे सांगण्यात आले आहे.