मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्री या महिन्यात ब्राइड्स टुडेमध्ये कव्हरस्टार म्हणून दिसली यावेळी तिने बॉयफ्रेंड मॅथियास आणि तिच्या पसंतीच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले. तापसीने हे देखील उघड केले की तिला नेहमीच फिल्म इंडस्ट्रीबाहेरील कोणालातरी डेट करायचे होते. असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
तापसी डेनमार्क बॅडमिंटनपटू मॅथियास बो याला डेट करत आहे. आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले. तिने सांगितले की तिला कोणत्या प्रकारचे लग्न अधिक आवडेल. याबद्दल बोलताना तापसी म्हणाली की, तिला नेहमीच इंडस्ट्रीबाहेरील कोणीतरी मिळावे असे वाटत होते.
तापसी पुढे म्हणाली की अर्थातच त्यांची संस्कृती वेगळी आहे पण ते एकमेकांना खूप चांगले समजतात. अलीकडेच तापसीने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला नेहमी इंडस्ट्रीबाहेरील कोणी तरी मिळावा. मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्या व्यक्तीला भेटले. ज्याच्या बरोबर मला शांती मिळते. तापसी पुढे म्हणाली की, आम्ही दोघे वेगळे आहोत. त्यामुळे आमच्या चर्चाही खूप रंजक होतात. एकमेकांची संस्कृती वेगळी आहे जी खूप सुंदर आहे.