मोरगांव : मोरगांव-बारामती रस्त्यावरील तरडोली गावच्या हद्द्दीतील राखीव वनक्षेत्रालगत रात्री साडेदहा वाजता ट्रक्टर व कारचा भीषण अपघात झाला . यामध्ये बारामती येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , पुण्यावरून बारामती येथे जाणारी वॅगनर गाडी क्र. एम.एच. १२ पी . टी . ७०७३ ही तरडोली गावच्या हद्दीत खटकळीच्या ओढ्यामध्ये आली. त्याचवेळी उसाने भरलेला ट्रक्टर नं एम. एच ४२ बी. बी .८५५७ ची ट्रेलर नं एम. एच . ४२ क्यु ५७१३ ला पाठीमागून जोरदार धडक दिली . यामध्ये कारचा चक्काचुर झाला होता.तसेच यातील कवीता उदय शहा , अश्विनी श्रेणीक भांडारी , मिलींद श्रेणीक भांडारी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी असुन त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे
घटनेची खबर मिळताच तरडोलीचे परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरु केले होते . घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख , एएसआय जाधव , पोलीस नाईक प्रशांत पिसाळ , पोलीस मित्र परेश भापकर यांनी धाव घेतली व जखमीला रुग्णालय हलविले.