बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या “गदर’ने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. या चित्रपटातील आयकॉनिक “हॅंड पंम्प’ सिन लोक आवर्जून पाहतात.
या चित्रपटात सनी देओलसह अमिषा पटेलने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सोशल मीडियावर “गदर-2’च्या शूटिंगचे फोटो व्हायरल होत आहे.
“गदर -2′ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा सनी देओलचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमधील सनीच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात सकिना ही भूमिका अमिषा पटेल तर तारा सिंग ही भूमिका सनी देओल साकारणार आहेत.
“गदर-2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा हे करणार आहे. “गदर’ या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 133 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे गदर-2 चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.