बेंगळुरू – टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघात आठ नवोदित आणि आठ अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघात 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या आठ हॉकीपटूंचा समावेश आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपाल हिच्याकडे सोपवण्यात आले असून ड्रॅगफ्लिकर गुरजित कौर, उदिता, निशा, नेहा, नवनीत कौर, शर्मिला देवी, लालरेमसियामी या नवोदित खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.
मिझोरामची सलिमा टेटे हिलाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. राणीसह गोलरक्षक सविता, दीप ग्रेस इक्का, सुशिला चानू, मोनिका, निक्की प्रधान, नवज्योत कौर आणि वंदना कटारिया या अनुभवी खेळाडूंवर भारताची मदार राहणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघ –
राणी रामपाल (कर्णधार), सविता, दीप ग्रेस इक्का, निक्की प्रधान, गुरजित कौर, उदिता, निशा, नेहा, सुशिला चानू, मोनिका, नवज्योत कौर, सलिमा टेटे, नवनीत कौर, वंदना कटारिया, लालरेमसियामी, शर्मिला देवी.