साउदम्पटन – न्यूझीलंडविरुद्धच्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला एक अनोखा विक्रम आपल्या नावावर जमा करण्याची संधी आहे. भारताचे महान क्रिकेटपटू व माजी कर्णधार कपिल देव यांच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे.
या सामन्यात 44 धावा केल्यावर तो कपिल यांच्या कामगिरीला मागे टाकण्याची संधी जडेजाला मिळाली आहे. जडेजाने 1 हजार 954 धावा केल्या आहेत.
तसेच त्याने 220 बळी घेतले आहेत. या सामन्यात 44 धावा केल्यावर जडेजाच्या 2 हजार धावा पूर्ण होतील. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा आणि दोनशेपेक्षा जास्त बळी मिळवणाऱ्या यादीत त्याचा समावेश होणार आहे.
जडेजाचा हा 52 वा कसोटी सामना आहे. यापूर्वी भारताच्या कपिल देव यांनी 50 सामन्यांमध्ये दोन हजार धावा आणि 200 बळी पूर्ण केले आहेत. हीच कामगिरी करण्यासाठी भारताच्या रवीचंद्रन अश्विनला 52 सामने खेळावे लागले होते. हा विक्रम सर्वात कमी सामन्यांमध्ये इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बोथम यांनी रचला आहे.