पुणे – शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहराच्या नारायण पेठेतील लसीकरणाच्या मध्यवर्ती भांडारात केवळ 4 हजारच डोस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे गुरूवारी अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.
पुणे जिल्ह्यात बुधवारी लसींचा साठा संपल्याने १०९ लसीकरण केंद्र बंद होते. ३९१ केंद्रांवर बुधवारी ५५ हजार ५३९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पण, लसीचा साठा संपल्यामुळे हजारो लोकांना लसीकरण न करताच परत जावे लागत आहे.
Pune District vaccinated 55,539 persons today in 391 vaccination centers today. Several thousand people went back without being vaccinated because the vaccines stock was exhausted…1/3
— Supriya Sule (@supriya_sule) April 7, 2021
लसीच्या अभावामुळे आपला लसीकरणाचा वेग कमी होईल. जीव वाचविण्यासाठी तसेच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी संमती असलेल्या प्रत्येकाला लस देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे कृपया आम्हाला लसीचा पुरवठा करा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी डॉ. हर्षवर्धन यांना केली आहे.
Requesting Hon. @drharshvardhan
Ji to kindly help us with the COVID 19 Vaccines..3/3— Supriya Sule (@supriya_sule) April 7, 2021
दरम्यान, संपूर्ण राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यात दररोज सुमारे 18 ते 19 हजार लसीकरण होते. याशिवाय सरकारी आणि खासगी मिळून 140 लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. बुधवारी दिवसभरात बहुतांश लसीकरण केंद्र सुरू होते. परंतु काही केंद्रांना महापालिकेकडून लसच मिळाली नसल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. लस कधी उपलब्ध होणार याबाबत राज्याकडून काहीच माहिती मिळाली नाही. अजमितीला चार हजारच डोस शिल्लक असल्याचे महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले आहे.