लॉकडाऊनच्या भितीने रुपयाची मोठी घसरण

मुंबई – पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या भितीने अर्थव्यवस्था सुधारणेच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसला असून ट्रेडर्सनी डॉलरची खरेदी करण्याचा सपाटा लावल्याने बुधवारी एका डॉलरसाठी 74.47 रुपये मोजावे लागत होते. ऑगस्ट 2019 पासूनच्या वीस  महिन्यातील रुपयाची ही सर्वात मोठी घसरण आहे. बुधवारी आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची तब्बल 105 पैशांनी घसरण झाली. गुरुवारी सकाळी रुपयाच्या घसरणीला काहीसा ब्रेक लागून तो सावरल्याचे दिसत होते. सकाळी साडेऩऊ वाजण्याच्या सुमारास डॉलरमागे रुपयाचा दर 74.36 इतका होता.

सलग चौथ्यांदा व्याजदर कायम  ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने बुधवारी जाहीर केल्यानंतर रुपयाच्या भावात मोठी घसरण झाली. दुसरीकडे सकारात्मक बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021-22 साठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 11.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर नेला आहे. असे घडले तर प्रथमच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर दोन आकड्यांमध्ये दिसू लागणार आहे. मात्र रुपयाच्या घसरणीमध्ये या सकारात्मक बाजू सध्या तरी दिसून येत नाहीत.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणि देशभर वाढत असणारे करोनाचे रुग्ण यामुळे गुंतवणूकदारांना धक्क बसला आहे. त्यामुळेच रुपयाच्या घसरणीचा अंदाज वर्तवला जात आहे.

रुपयाची घसरण झाली की, सगळ्यात मोठा धक्का आयात वस्तूंना बसतो. भारत कच्च्या तेलाची आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंची सगळ्यात मोठी आयात करतो. याचा परिणाम सध्या तरी शेअर बाजारात दिसलेला ऩाही. त्यामुळे रुपयातील सध्याची घसरण ही तात्पुरती घटना असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.