नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधिश एन. व्ही. रमणा यांची देशाचे नवे सरन्यायाधिश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते येत्या 24 तारखेला आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्या दिवशी विद्यमान सरन्याधिश बोबडे हे निवृत्त होत आहेत. न्या राणा यांची मुदत 26 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे. प्रथेनुसार पंतंप्रधानांचे प्रिसिंपल सेक्रेटरी पी. के. मिश्रा आणि न्याय विभागाचे सचिव बरूण मित्रा यांनी त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना न्या रमणा यांना आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान केली. सेवा ज्येष्ठतेनुसार न्या रमणा यांची सरन्यायाधिशपदासाठी मावळते सरन्यायाधिश बोबडे यांनी निवड करून त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली. त्याला सरकारने मंजुरी दिली. न्या रमणा हे मुळचे आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी या आधी आंध्रप्रदेश हायकोर्टात मुख्य न्यायाधिश म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली.