मोठी बातमी! ESIC हॉस्पिटलमध्येही करोना बाधितांवर उपचार; महापालिका पुरविणार सर्व व्यवस्था

पुणे – राज्य शासनाच्या बिबवेवाडीतील “एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ (ईएसआयसी) रुग्णालयातही करोना बाधितांवर उपचार केले जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ही माहिती दिली.

शहरातील दररोज करोना बाधितांची संख्या वाढतच असल्याने खासगी रुग्णालय तसेच शासकीय रुग्णांलयतील बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे पालिक खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड राखीव करतानाच; आता “ईएसआयसी हॉस्पिटल’शी संपर्क साधून त्यांच्याकडील बेड कोविड उपचारांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.

रुग्णालय प्रशासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून येथे 100 बेड महापालिकेस उपलब्ध होणार आहेत. येथे 75 ऑक्‍सिजन बेड असून त्यासाठी पालिकेकडून ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. याठिकाणी किचन, लॉंड्रीची व्यवस्था केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.