पणजी – कर्नाटकातील एका रस्ते अपघातात जखमी झालेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर काल रात्री गोवा मेडिकल कॉलेजच्या रुालयात अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांची प्रकृती आता थिर असल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले.
68 वर्षीय नाईक यांच्या दोन्ही हातांना आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे. काल झालेल्या या अपघातात त्यांच्या पत्नी विजया यांचे निधन झाले असून त्यांच्या स्वीय सहायकाचाही यात मृत्यू झाला आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्यात अंकोला येथे हा अपघात झाला. ते धरमशाला येथून आपल्या गोव्यातील निवासस्थानी परतत असताना हा अपघात झाला. श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्यातील खासदार असून ते आयुष मंत्रालयाचे तसेच संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आधी नमूद केले होते पण त्यांची प्रकृती आता थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.