मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपला दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले कि, सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही १० सूड काढू. आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतल्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
ऊद्या..
Tomorrow…
धमाका.. pic.twitter.com/IFTvYb1eAF— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2020
‘मुख्यमंत्री हात धुवा’ यापलीकडे काय सांगतात अशी एक टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. यावर उद्धव ठाकरेंनी म्हंटले कि, हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन. विकृत बुद्धीचे चाळे करु नका. आव्हान मिळाल्यावर मला स्फुर्ती येते. आडवे येणाऱ्यांना आडवे करुन महाराष्ट्र पुढे जाईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.