जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७२६ वर
सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नव्या ८ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७२६ झाली आहे.
शनिवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या ८ जणांचे रिपोर्ट करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या करोनाबाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील कोडोली येथील ४२ वर्षीय पुरुष, वय १७ व १४वर्षीय युवती.
खंडाळा तालुक्यातील लोणंद (आनंदगाव) येथील ३८ वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील शेलारवाडी येथील ५७ वर्षीय पुरुष, बावधन नाका वाई येथील २५ वर्षीय पुरुष.
कराड तालुक्यातील तुळसण येथील ६० वर्षीय पुरुष
महाबळेश्वर तालुक्यातील बेल एयर हॉस्पीटलमध्ये मुळचा चेंबूर मुंबई येथील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या एकूण ७२६ झाली असून करोनातून बऱ्या झालेल्यां ४९९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये करोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या १९६ इतकी झाली आहे तर ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.