पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयातून शनिवारी (दि. 13) 3 जण करोनामुक्त झाले. त्यामध्ये भवानी पेठ (पुणे) आणि बोपोडी येथील रुग्णांचा समावेश आहे.
बोपोडी येथील 72 वर्षीय वृद्ध आणि 46 वर्षीय पुरूषाच्या 14 दिवसानंतर घेतलेल्या सलग दुसऱ्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्याशिवाय, पुणे येथील 34 वर्षीय महिला देखील करोनामुक्त झाली. त्यामुळे तिलाही आज घरी सोडले.
रुग्णालयामध्ये आज दिवसभरात नवीन करोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. तथापि, 7 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले. रुग्णालयात सध्या 24 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत 52 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.