नगर – जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 511 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4304 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 117, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 126 आणि अँटिजेन चाचणीत 268 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 45, अकोले 15, जामखेड 3, कर्जत 4, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 14, नेवासा 2, पारनेर 5, पाथर्डी 3, राहाता 3, राहुरी 3, श्रीगोंदा 6, मिलिटरी हॉस्पिटल 5, इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 126 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 46, अकोले 1, जामखेड 3, कर्जत 2, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 15, नेवासा 9, पारनेर 3, पाथर्डी 6, राहाता 9, राहुरी 12, संगमनेर 7, शेवगाव 3, श्रीरामपूर 8 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 268 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 17, अकोले 14, जामखेड 23, कर्जत 17, कोपरगाव 8, नेवासे 9, पारनेर 10, पाथर्डी 46, राहाता 12, राहुरी 17, संगमनेर 53, शेवगाव 14, श्रीगोंदा7, श्रीरामपूर 11, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 136, अकोले 32, जामखेड 63, कर्जत 47, कोपरगाव 19 नगर ग्रा. 47, नेवासे 44, पारनेर 35, पाथर्डी 43, राहाता 49, राहुरी 39, संगमनेर 70, शेवगाव 44, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 41, मिलिटरी हॉस्पिटल 8, अशा रुग्णांचा समावेश आहे.