पुणे : लॉकडाउनमध्ये मास्कचा पुरविठा करण्याच्या बहाण्याने एकाने व्यावसायिकाला तब्बल 7 लाखांचा गंडा घातला. ही घटना नाना पेठेत एप्रिल ते जून 2020 कालावधीत घडली.
याप्रकरणी ताहा राजकोटवाला (वय 31, रा. कोंढवा ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहा यांचा नानापेठेत ऑर्चिड फर्निशिंग एलएलपी नावाने मेटेरियल ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. लॉकडाउनमुळे त्यांनी इंडिया मार्ट कंपनीकडे 25 हजार मास्क पुरवठा करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांनी कंपनीकडे रक्कम ऑनलाईनरित्या वर्ग केली. मात्र, संबंधित वैंपनी चालकाने ताहा यांच्याकडून रक्कम स्वीकारुन मास्कचा पुरवठा न करता 7 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विवेक पाडवी अधिक तपास करीत आहेत.