पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे धरणात येणारया पाण्याची आवक वाढत आहे सध्या 67 हजार 277 कयुसेक पाणी धरणात येत आहे धरणाचा पाणीसाठा 104.16 टीएमसी झाला असून धरणाच्या सहा दरवाजे 10 फुटांनी उचलून कोयना नदीत 87 हजार 338 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीवर असणारा मोरगिरी विभागाला जोडणारा नेरळे पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे मोरगिरी विभागातील दळणवळण ठप्प झाले असून पाटण शी संपर्क तुटला आहे तसेच पाटणच्या दक्षिण विभागाला जोडणारा मुळगाव पूलही पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडे गावांचा पाटण शी जवळचा संपर्क तुटला आहे तर दळणवळण ठप्प झाले आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात नेरळे व मुळगाव पूल पाण्याखाली गेल्याने मोरगिरी व मूळगाव परिसरातील गावांचा पाटणच्या बाजारपेठेची संपर्क तुटला आहे यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसात हे दोन्ही पूल पुन्हा पाण्याखाली गेल्याने या पूलांवरून वाहतूक करणे धोकादायक ठरणार आहे. दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असून गेल्या बारा तासात नवजा 241 मिलिमीटर कोयनानगर 138 मिलिमीटर महाबळेश्वर 136 मिलिमीटर वळवण 187 मीटर पावसाची नोंद झाली आहे.